"हाथरस" बलात्कार प्रकरणाचे सत्य काय आहे ? आणि प्रकरण सध्या कोणत्या स्थितीत आहे ? । जाणून घ्या जसे आहे तसे.
"हाथरस" बलात्कार प्रकरणाचे सत्य काय आहे ? आणि प्रकरण सध्या कोणत्या स्थितीत आहे ? । जाणून घ्या जसे आहे तसे.
----------------------------------------------------------------
परवा उत्तरप्रदेश मधील हाथरस येथे एका दलित (खालच्या) जातीच्या मुलीवर त्याच गावातील काही सवर्ण (वरच्या) जातीच्या तरुणांनी सामूहिक बलात्कार केला, आणि काही दिवसांच्या उपचारानंतर मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रकरण मिडिया तसेच सोशलमिडिया वर उचलून धरले आणि आपल्याला सोईस्कर अशी माहिती पसरवायला सुरू केली. आरोपी सवर्ण आणि पीडित दलित आहे म्हंटल्यावर येथे काहींना राजकीय फायदा होता तर काहींसाठी TRP ची मांदियाळी. यातून बऱ्याच प्रकारची माहिती समोर येऊ लागली त्यामुळे लोकं खूप गोंधळलेले दिसत आहेत त्यामुळे हे प्रकरण नेमके काय आहे हे समोर आणणे आवश्यक आहे.
या प्रकरणामध्ये त्या मुलीचे कुटुंबातील लोकांचे म्हणणे आणि तपास करणाऱ्या पोलिसांच्या मतांमध्ये विसंगती दिसत आहे त्यामुळे आपण दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करू.
🔹 १४ सप्टेंबर २०२० : पीडितेच्या आईने जबाब दिला की, ती आणि पीडित मुलगी शेतामध्ये गवत कापण्यासाठी गेले होते. काही वेळाने पीडित मुलगी आई पासून दूर झाली. तेवढ्यात काही मुलांनी मुलीला ओढत दुसऱ्या शेतात नेले पण आईला ऐकायला कमी येत होतं त्यामुळे कानात रुई घातल्यामुळे ऐकू आलं नाही. थोड्या वेळाने आईने मुलीची शोधाशोध सुरू केली, पीडित सापडली तेंव्हा ती अर्धनग्न आणि जखमी अवस्थेत होती. पीडितेचे पाठीचे हाड मोडले होते, जीभ थोडी बाहेर आली होती आणि ती थोडी कापलेल्या अवस्थेत होती. आई आणि पीडितेचा भाऊ पीडितेला घेऊन जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये गेले. आधी नोंद घ्यायला तयार नसलेले पोलीस नंतर बऱ्याच वेळाने तक्रार नोंद करायला तयार झाले.
तक्रारीत संदीप नाव आले. मुलगी काही बोलायच्या स्थितीत नव्हती पण जेवढं काही तिने बोलण्याचा प्रयत्न केला त्यात तिने आपला खून करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले पण बलात्कार झाल्याचा काही उल्लेख यामध्ये केला गेला नाही. याच दिवशी पीडितेला अलिगढ मधील जवाहरलाल नेहरु रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले.
🔹 १९ सप्टेंबर २०२० : १४ सप्टेंबर रोजी पीडितेने ज्या संदीप चे नाव घेतले होते त्याला अटक करण्यात आली.
🔹 २१ सप्टेंबर २०२० : यादिवशी पीडितेने परत जबाब दिला. यामध्ये पीडितेने संदीप व्यतिरिक्त आणखी तीन व्यक्ती त्या गुन्ह्यात सामील होते असे सांगितले. त्या तिन्ही व्यक्तींवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली. या दिवशीच्या बोलण्यामध्ये पीडितेने बलात्कार झाल्याचा उल्लेख केला. त्यानंतर त्या चार व्यक्तींवर बलात्काराचा पण गुन्हा दाखल झाला.
पीडितेच्या आईने सांगितले की पीडितेने बलात्कार झाला असल्याचे सांगितले नव्हते पण पीडितेच्या योनीच्या ठिकाणी काही रक्ताचे डाग दिसले होते. पण आम्ही पण असे नाही बोललो की बलात्कार झालाय कारण तसे बोलल्याने परिवाराच्या समाजातील इज्जती ला धक्का लागतो ज्या प्रकारच्या समाजात आपण राहतो. पण पीडितेने जेंव्हा बलात्कार झाल्याचे सांगितले तेंव्हा आई आणि बाकी परिवाराने पण तिच्या बोलण्याला पुष्टी (Confirmation) दिली.
🔹 २७ सप्टेंबर २०२० : पीडितेच्या परिवाराने सांगितले की रुग्णालय जबरदस्ती करत होते की पीडितेला घेऊन आम्ही AIIMS किंवा सफदरजंग रुग्णालयात जावे, पण त्यांनी कोणत्याही रुग्णालयाची शिफारस नाही केली. पीडितेच्या भावाने सांगितले की नेहरू रुग्णालयाने इतर रुग्णालयाची शिफारस केली असती आणि सांगितले असते की आम्ही उपचार करू शकत नाही तर ते आमच्यासाठी चांगलं झालं असतं.
🔹 २८ सप्टेंबर २०२० : या दिवशी पीडितेला सफदरजंग रुग्णालयात दाखल केले जाते. अलिगढ रुग्णालयात पीडित मुलगी अतिदक्षता विभागात होती. जशी अवस्था पीडितेची नेहरू रुग्णालयात होती, त्या अवस्थेत इथेही काही सुधारणा होत नाही.
🔹 २९ आणि ३० सप्टेंबर २०२० : २९ तारखेला पीडितेच्या तब्येतीत काही फरक पडत नाही आणि त्याच दिवशी सायंकाळी तिचा दुर्दैवी मृत्यू होतो. ३० तारखेला सकाळी तिला तिच्या गावी नेले जाते. तिच्या कुटुंबातील व्यक्तींच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाला एका खोलीत बंद केले आणि जिथे पीडितेवर अंत्यसंस्कार केले गेले त्या ठिकाणी त्यांना जाऊ दिले नाही [१].
🔸 पोलिसांच्या कथणीतून : आतापर्यंत पीडितेवरील अत्याचाराबद्दल जे बोलले जात होते की पीडितेची जीभ कापली होती, डोळे बाहेर आले होते किंवा पाठीचे हाड मोडले होते वगैरे हे सर्व पोलिसांनी नाकारले आहे. गळ्यावर दाब आल्यामुळे दातांच्या मध्ये जीभ आल्यामुळे थोडी कापली गेलीये तसेच पाठीचे हाड ठीक ठाक काम करत नाहीये तसेच डोळे बाहेर येणे किंवा जीभ कापली असा उल्लेख वैद्यकीय आवहालामध्ये कुठेही आलेला नाहीये असे म्हणत पोलिसांचे वरील सर्व आरोपांचे खंडन केले आहे.
पोलिसांनी आणखी एक सांगितले की, पीडित मूलीवर अंत्यसंस्कार तिच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत केले गेले [२]. इथे आम्हाला एका खोलीत बंद केले असे म्हणणाऱ्या पीडितेच्या कुटुंबातील व्यक्तींच्या बोलण्यात आणि पोलिसांच्या बोलण्यात विसंगती दिसत आहे.
🔸 उत्तरप्रदेश सरकारचा स्टँड : या सर्व घटनेनंतर उत्तरप्रदेश सरकार ने एक SIT (Special Investigation Team) रुजू केली. SIT यांना एक अहवाल सादर करेल आणि त्यानंतर हा खटला "फास्ट ट्रॅक कोर्ट" मध्ये चालवला जाईल [३]. उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडितेच्या कुटुंबाला रुपये २५ लाख भरपाई आणि कुटुंबातील एका व्यक्तीला ज्यू. अकौंटंट ची नोकरी दिली जाईल असे सांगितले [४]. योगी आदित्यनाथ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे पीडितेच्या कुटुंबियांशी चर्चा देखील केली.
🔸 घटनेला राजकीय वळण : १ ऑक्टोबर २०२० रोजी काँग्रेस चे राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा याना पोलिसांनी अटक केली ज्यावेळी ते पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जात होते [५]. राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा यांच्यावर या घटनेनंतर चौफेर टीकाही झाल्या, कारण केवळ दलित पीडित आणि आरोपी हिंदू सवर्ण असेल तरच काँग्रेस आक्रमक होते मग इतर अत्याचारा वेळी काँग्रेस किंवा गांधी परिवार न्यायासाठी का पुढे येत नाही ? असाही प्रश्न विचारला जात आहे. अशा संवेदनशील घटनेत पण राजकीय फायदा बघणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर टीकेचे झोड उडत आहेत.
अखेर उपस्थित काही प्रश्न : या सर्व घटने दरम्यान काही प्रश्न समोर आले आहेत त्यामुळे लोकं गोंधळून गेले आहेत, त्यावर एक नजर टाकू.
१]. बलात्कार झाला की नाही ?
सुरुवातीला बलात्कार झाल्याचा उल्लेख न करणाऱ्या पीडितेने नंतरच्या बोलण्यात बलात्कार झाला असे सांगितले. पण फॉरेन्सिक अवहाल आल्यानंतर प्रशांत कुमार यांनी सांगितले की बलात्कार झालेला नाही, कारण पीडितेच्या अंगावर कुठेही विर्याचे काहीच निशाण दिसले नाही [६]. (खरं तर यापेक्षा खोलवर जाऊन तपास करणे आवश्यक होते).
२]. अंतिम संस्कार रात्रीत का केले ?
हा प्रश्न सर्वच लोकांना पडला आहे की, रात्रीत घाईघाईने अंत्यसंस्कार का केले ?, पीडितेच्या कुटुंबीयांनी पण आम्हाला एका खोलीत बंद करून अंत्यसंस्कार केले, शेवटचे पाहुही दिले नाही असा आरोप केला. खरंतर बलात्कार जेवढा हृदयद्रावक होता तेवढीच ही घटना पण हृदय पिळवटून टाकणारी आहे, की पीडितेच्या घरच्यांना तिचे अंतिम दर्शनही घेता आले नाही. इथे एक मुद्दा असा आहे की, पोलीस म्हणतात की अंत्यसंस्कार पीडितेच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत केले गेले पण इथे नेमके कोण नातेवाईक हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाहीये. कारण पीडितेच्या घरचे तर हे नाकारत आहेत.
पोलिसांनी अंत्यसंस्कार करण्याबाबत सांगितले की, शरीराचे शवोच्छेदन (Post-Mortem) केले असल्याने शरीर विघटित (Decompose) होत होते. पोलीस असेही सांगत होते की पीडितेचा मृतदेह घरी नेला असता तर तिथे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न झाला असता किंवा मोठ्या संख्येने लोक उपस्थित होऊन दंगा भडकण्याची शक्यता होती, कारण या प्रकरणाला जातीय वळण लागले होते. पीडित दलित समाजाची होती तर आरोपी सवर्ण समाजातून होते आणि त्या दोन्ही कुटुंबामध्ये यापूर्वीही वाद झाले होते. म्हणून हा निर्णय घ्यावा लागला असे पोलिसांनी स्पष्ट केले.
मुलीवर बलात्कार झाला आणि त्यात तिचा मृत्यू झाला, ही घटना आपण बदलू शकत नाही पण इथून पुढे अशा घटनांना आळा बसेल यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढणे आवश्यक आहे. 🙏
संदर्भ :
[१] https://bit.ly/33CvBzV,
[२] https://bit.ly/2SykKAN,
[३] https://bit.ly/36HlSu0,
[४] https://bit.ly/33Cw5G9,
[५] https://bit.ly/2SDezew,
[६] https://bit.ly/34BFWeM
जय हिंद 🇮🇳 वंदे मातरम् 🚩
©️ Ex-Scholar Official
Comments
Post a Comment