संवीधान निर्मीती मे बाबा का महत्व उतनाही था,जितना सब्जी मे कढी पत्ता होता है.

Anurag Vidvat मला आहे आक्षेप?
आंबेडकर यांचं संविधानात योगदान सर्वश्रेष्ठ आहे .. कुणाला आक्षेप असल्यास चर्चा करावी..

1-Anurag Vidvat कारण बाबासाहेबाचे योगदान काहीच नाही.

2-विश्वास इश्वरचंद पौनीकर  तेच योगदान कसे नाही ते एकदा विस्तृत सांगा.. आणि कोणाचे आहे ते पण सांगा..   अशी शंका घेतली त्याबद्दल तुमच कौतुक आहे कारण त्याने अनेक गोष्टी स्पष्ट करता येतात.. 

👉विश्वास इश्वरचंद पौनीकर आणि बिनधास्त बोला कारण मी तथ्यावर आधारित बोलतो.. 

🤓Anurag Vidvat सर्व योगदान इंग्रज व आयरीश चे आहे माध्यम बि एन राव सहीत  अनेक ब्राम्हण आहेत.

👊विश्वास इश्वरचंद पौनीकर  बी एन राव हे सरकारी नोकरदार होते.. 
  आंबेडकर यांनी प्रचंड काम केलेल्या fundamental rights subcommittee सारख्या उपसमित्यांचे अहवाल एकत्र करून तो कच्चा आराखडा जमवण्याचं काम बी एन राव यांच्या कडे होतं..  तोच आराखडा नंतर आंबेडकर यांना कायद्याचे जाणकार म्हणून सोपवला..   तो अत्यंत छोटा आरखडा व वरवरचा आराखडा होता.. नंतर आराखडा आंबेडकरांनी वाढवला. प्रचंड व्यापक.बनवला..
  बी एन राव यांना संविधान सभेत मतदानाचाही अधिकार नव्हता .. त्यांना फक्त संविधान सभेतील लोकांच्या मर्जीने वागावं लागायचं.. नाहीतर नोकरीतून काढून टाकण्याची भीती होती.. 
  या उलट आंबेडकर यांनी कीत्येक तरतुदी संविधान सभेच्या मनाविरुद्ध संविधानात नमूद केलेल्या आहेत.. आंबेडकर यांना प्रत्येक तरतुदीत विस्तृत अभ्यास करून त्यात आलेल्या प्रत्येक गोष्टीचा अतंर्भाव आंबेडकरांनी केला आहे.. 
   संविधान सभेत मसूदा जेव्हा चर्चेत यायचा तेव्हा आंबेडकर यांनाच प्रत्येक व्यक्तीच्या शंकेचं निरासन करावं लागायचं, कित्येक लोकांच्या मतांना आंबेडकर यांनी बदललेलं आहे.. संविधान सभेतील मतपरिवर्तन आंबेडकर यांनाच करावं लागायचं..  
   कोणतीही एमेंडमेंट आली तर ती मतदानाला ठेवणे कींवा न ठेवता धुडकावून लावणे हा अधिकार आंबेडकर यांनाच होता.

Anurag Vidvat आंबेडकर संवीधान सभेत काय होते.?

विश्वास इश्वरचंद पौनीकर आंबेडकर संविधान सभेत सदस्य म्हणून निवडून गेलेले होते..   
  बाकी जातीमुळे कोणाच्या योगदानाला कमी लेखू नये.. माझ्या जुन्या पोस्ट बघून घे.. मी तर पेशवा बाजीराव यांना सर्वात शुर राजा म्हणतो.. उगाच जातीमुळे कोणाच्या  योग्यतेवर शिंतोडे उडवू नये

Anurag Vidvat मी जाती चे नांव ही घेतले नाही मला उगाच इतरांचे श्रेय हडपून एका माणसाला श्रेय देणे आवडत नाही .
घटना लिहणे हे एका माणसाचे काम नसते त्यामूळे एका माणसाला संविधान निर्माता व शिल्पकार म्हणने मी अध श्रध्दा समजतो.
ज्याचे जेवढी मेहनत असेल तेव्हढेच श्रेय देण्यात यावे या मताचा मी आहे.बाकी बाबासाहेबांना विरोध करण्याचे कारण नाही.

विश्वास इश्वरचंद पौनीकर  तेच मी म्हणतोय आंबेडकर यांना जातीमुळे टार्गेट करण्यात येतं.. त्यांना संविधानाचे जनक सर्वात जास्त योगदानाबद्दल म्हटल्या जाते .. 

Anurag Vidvat योगदान काय हेच तर मी विचारीत आहे .किती समीत्या होत्या मसूदा समीती नंतर का बनवली गेली ?

अजून एक एक गृप फोटो आहे त्यात शेवटच्या रांगेतील शेवटचा फोटोमधे बाबासाहेब उभे दिसतात.
तो फोटो पहा ....योगदान कळून येईल.

विश्वास इश्वरचंद पौनीकर  शेठ तो कधीचा आहे ते पण सांगावं.. 

विश्वास इश्वरचंद पौनीकर  संविधान सभेत कॉंग्रेस चे उमेदवार सगळ्यात जास्त होते  आंबेडकर हे कॉंग्रेस विरोधी होते. .. संविधान सभेचं दुसरं काम सरकार म्हणूनही कामकाज करणं होतं.. 

Anurag Vidvat संविधान निर्मीण प्रक्रिये मधलाच आहे.होता माझ्या जवळ आता नाही गुगल मार .

Anurag Vidvat भावा कान्ग्रेस विरोधी बाबासाहेब होते हे खरे आहे व खानग्रेस ने लोकशाही मार्गाने त्यांना कधीही निवडून येवू दिले नाही भंडार्‍याला एका साधारण माणसाने त्यांना हरवले होते,
अशी परीस्थीती असताना संवीधा प्रक्रियेचा भाग कोणाच्या सांगण्यावरून जबरदस्तीने त्यांना घेण्यात आले? हे पण आज लोकांना माहीत आहे.
असे योगदान असते काय?

विश्वास इश्वरचंद पौनीकर  संविधान सभेत आंबेडकर स्वतः स्वबळावर मुस्लिम मतांनी बंगाल मधून निवडून गेले.होते.  आंबेडकर १९५२ पर्यंत कोणत्याही निवडणूकीत हारले नाहीत..

   ते स्वतः १९३७ ला भायखळ्यात आमदारही होते.. त्यांच्या पक्षाचे १७ पैकी १३ आमदार जिंकले होते.. 
  १९५२ ला कॉंग्रेसनी त्यांना फील्डींग व पैसा लावून पाडलं.. . तरी इतर ठिकाणी त्यांच्या पक्षाचे व त्यांनी उभें केलेले अनेक लोकं निवडून आले होते.. 

Anurag Vidvat आपण स्वातंत्र्या पूर्वीचे विसरून जावू. आंबेडकर कधीही १९५६पर्यंत निवडून संसदे मधे गेले नाहीत व आमदार ही झाले नाहीत .
बाकी प्रश्नाची ऊत्तर शोध. जोगेन्द्रनाथ मंडल जो फाळणी नंतर पाकीस्थानात गेला त्याला बाबासाहेब गुरू मानायचे.व त्याच्यामूळे मूस्लीम च्या समर्थाननाने संविधान सभेत पोचले.स्वबळावर नाही.

विश्वास इश्वरचंद पौनीकर मित्रा आंबेडकर जरी कॉंग्रेसच्या पैशामुळे फंडींगमुळे पडले तरी त्यांच्या पक्षाचे खासदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनसंघ पेक्षा जास्त निवडून यायचे .. त्यांनी उभे केलेले उमेदवार जिंकायचे ... 

Anurag Vidvat डेटा असल्यास दे.
त्यांच्या म्हणजे कोणत्या पक्षाचे खासदार आणि किती आले होते?

विश्वास इश्वरचंद पौनीकर  ओके १९५७ च्या उमेदवारांना आंबेडकरांनी राजगृहावर नोव्हेंबर- डीसेंबर 1956  ला निवडलं होतं .. ते निवडून आले ..  याआधीही त्यांनी अपक्ष लढवलेले व पक्षाचे उमेदवार जिंकून आले होते..

विश्वास इश्वरचंद पौनीकर  scheduled Caste Federation  चे उमेदवार बघावे.द्रविडी व दक्षिणेतील अपक्षही बघावेत

Anurag Vidvat दादा सहा जन संघ पांच आज ते ३७६आहेत आणि सगळे आरपिआय मोजले तरी सहा होत नाहीत.
किती लज्जास्पद आहे.

विश्वास इश्वरचंद पौनीकर  RPI हा पक्ष आंबेडकर यांनी राममनोहर लोहिया या समाएवादि नेत्यासोबत स्थापन करायचा ठरवला होता.. पण आंबेडकर यांचे निधन झालं . 
   आंबेडकरांच्या निधनानंतर लोहिया यांनी रिपब्लिकन पक्षात रस दाखवला नाही..  
  म्हणून महाराष्ट्रातील दलित नेत्यांनी रिपब्लिकन पक्ष स्थापन केला पण त्याला फक्त दलितांचा म्हणून शिक्का बसला..  
    लोहीया यांनी स्वतंत्र चळवळ उभी केली त्यांचे मुलायमसिंह यादव सारखे शिष्य पुढे उत्तर भारतात सत्तेतही आले...   आंबेडकर लोहीया दोघेही कॉंग्रेस विरोधी होते

विश्वास इश्वरचंद पौनीकर बाबासाहेब आंबेडकर आणि रिपब्लिकन पक्षाचा संबंध नाही.. 

Anurag Vidvat दादासाहेब गायकवाड व खोब्रागडे यांनी बाबासाहेबां पासून फारकत ते जिवंत असतानां चघेतली होती व सबकास्ट प्रमाणे आरपीआय हे गट स्थापण केले होते.नंतर पोटजाती नूसार गट वाढतच गेलेत खोरीप भारीप जोरीप आरीप....अॅन्ड सो आॅन.
मी नागपूरचा आहो. सगळा ईतीहास माहीत आहे राजाभाऊ खोब्रागडे....जे जनसंघा बरोबर शय्या सोबत करायचे जे आज प्रकाश आणि रामदास आठवले करतात कधी याच्यावरोबर तर कधी त्याच्याबरोबर.

विश्वास इश्वरचंद पौनीकर  मित्रा हा कुठून नवा इतिहास आणतोय तू ? 
 दादासाहेब गायकवाड आणि राजाभाऊ खोब्रागडे हे आजन्म आंबेडकर भक्त होते.   गुळ शेंगदाणे खाऊन प्रवास केला पण SCF पक्ष त्यांनी वाढवला.. ...

Anurag Vidvat वेगळे पक्ष काढले वर फेडरेशन मधे असतांना वाद विवाद होतेच आंबेडकरी साहीत्य वाच सगळा ईतीहास आहे.

Comments

Popular posts from this blog

मारपीट करने पर कानून - IPC Section - 323 324 325 326 & 307 308 in Hindi Explanation