पोलिसांनी आपल्यावर हात उचलल्यानंतर आपण काय करावे? आणि छोट्या कारणास्तव मारायचा त्यांना अधिकार आहे का?
छोट्याच काय पण कोणत्याही कारणास्तव मारामारी करण्याचा अधिकार नाही आहे पोलीस ना!
केवळ स्व रक्षण आणि गुन्हेगार देश सोडून पळून जात असेल तर त्याला पकडण्याचा अधिकार आहे!
पोलीस च्या समक्ष दिलेल्या बयाना ला अर्थात statement ला काहीही अर्थ नाही!
फक्त हिंदी सिनेमात असे अधिकार असलेले दाखवतात!!
श्रीराम।
याबाबत मी माझा अनुभव सांगतो. फक्त तुम्हीच सांगा मी बरोबर केले कि चुक.
स्थानिक गुन्हा अन्वेषण अर्थात एल् सि बी ने मला कोणत्याही गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठी एका व्यक्ती कडून तिस हजार रुपये लाच घेतली. तेंव्हा मी एका नामवंत कंपनीचे अधीकृत मोबाईल सर्व्हिस सेंटर चालवत होतो. त्यांच्या हिशोबाने मोबाईल चे दुकान. त्यामुळे त्यांना वाटले इथे नक्कीच काहीतरी बेकायदेशीर गोष्टी होत असणार त्यामुळे मी सहज जाळ्यात सापडेन.
सर्वप्रथम त्यांनी मला तुमच्या विषयी तक्रार दाखल झाली आहे आणि तुम्हाला नोटीस मध्ये नमूद केलेल्या तारीख आणि वेळेला चौकशी साठी हजर झाले पाहिजे. मी त्यांना तक्रार काय आहे आणि कोणी केली आहे ते सांगा म्हणजे मला त्या तयारीने येता येईल. त्यांनी मला गाफील ठेवण्यासाठी तुम्ही घाबरायचे कारण नाही. फक्त अम्हाला आमचे काम केले पाहिजे फक्त साहेब विचारतील त्या प्रश्र्नांची उत्तरे द्या आणि तुम्ही परत या असे सांगितले. मी त्यांनी सांगितलेल्या दिवशी त्या वेळी तिथे पोहोचलो. जे दोघे मला नोटीस देण्यासाठी आले होते तेंव्हा ते माझ्याशी फार आपुलकीने वागत बोलत होते. परंतु तिथे पोहोचताच त्यांची भाषा बदलली मला बेकायदा ताब्यात घेऊन माझ्यावर प्रश्र्नांचा भडीमार केला. त्यांना हवीत तशी उत्तरे न मिळाल्याने गिरणीला जो पट्टा असतो त्या पटलने दोन्ही हात शेजारी शेजारी तळहात वरील बाजूस समोरच्या बाजूला धरायला लावले व जोराने तळहातावर फटके मारले. त्या दिवशी रात्री तिथेच मुक्कामाल ठेवून घेतले दुसरा दिवस सुध्दा असाच गेला मला तिन च्या आसपास गाडीमध्ये घालून मला माझ्या मोबाईल सर्व्हीस सेंटर वर घेऊन आले. तिथे रिपेअर करण्या साठी वेगवेगळ्या ड्राव्हर मध्ये तसेच बॉक्स मध्ये ठेवले मोबाईल पाहून त्यांना वाटले की इतर रिपेअरींग च्या दुकाना प्रमाणे मोबाईल च्या कस्टमर चे किंवा बिलाचे काहीच रेकॉर्ड नसेल. त्यांनी मला हे सर्व मोबाईल जप्त करत आहोत आणि जोपर्यंत तु ज्या मोबाईलची बिले सादर करचील तेच मोबाईल तुला परत मिळतील बाकीचे विसरायचे. तेंव्हा मी त्यांना आठवण करून दिली कि हे कंपनीचे अधिकृत सर्व्हिस सेंटर आहे तेंव्हा इथे बिलाची झेरॉक्स घेऊन त्याची जॉबशीट ची एक प्रत आणि बिलाची झेरॉक्स मोबाईल सोबत लाऊन ठेवली आहे. तेंव्हा त्यांनी दोन तिन मोबाईल बॉक्स मधून काढून त्याच्या सोबत असलेली जॉबशीट आणि बिलाची झेरॉक्स चेक केली. त्या नंतर त्यांनी इथे असलेल्या सर्व मटेरिअल ची बिले सादर करायला सांगितली ज्या ज्या मालाचे खरेदीची बिले नसतील ते ते सगळे मटेरियल आम्हीं जप्त करणार आहे असे सांगितले. तेंव्हा त्यांना इथे जे काही मटेरियल येते ते कंपनी कडून येते आणि फ्रि मटेरियलचे सुध्दा ०.०१ रुपयांचे बिल असते असे सांगत बिलाची फाईल समोर ठेवली.
दोन तिन तास जवळपास नऊ जणांनी सगळे पिंजून काढले परंतु त्यांच्या हाती काहीच लागले नाही. शेवटी त्यांनी मला माझा सिपीयु सोबत घ्यायला लावला त्यांना सिपीयू मध्ये काहीतरी सापडेल अशी आशा वाटत होती. परंतु त्यांना जि गोष्ट सापडेल आणि त्या आधारे माझ्यावर गुन्हा दाखल करता येईल असे वाटते होते तो मुद्दा तर आम्ही नोटीस बोर्डवर नोटीस लाऊन अगोदरच क्लिअर केला होता परंतु त्यांना तेथे त्याची माहिती न देता त्या नोटीसीची फाईल मधील झेरॉक्स प्रत सोबत घेऊन मी त्यांच्या सोबत पोलिस मुख्यालयात आलो तिथे त्यांचे सायबर एक्सपर्ट पिसी वर शोधू लागले, तिथे त्यांनी डिलीट केलेल्या फाइल्स आणि फोल्डर रिकव्हर करण्याचे सॉफ्टवेअर वापरून रिकव्हर केल्या.
माझ्यावर कॉपिराईट खा ली गुन्हा नोंदविण्या इतपत पुरावे मिळाले आहेत असे सांगत त्यांनी मला त्यांच्या सिनिअर समोर उभे केले. मी सोबत नेलेली नोटीस बोर्डवर केलेल्या डिक्लेरेशन ची प्रत (त्यामध्ये असा उल्लेख होता कि ग्राहकांच्या मोबाईल फोन मध्ये असलेल्या इमेज, अॉडीओ व्हिडिओ, फोन बुक सह जे काही असेल ति ग्राहकाची मालमत्ता आहे ति जशी च्या तशी फोन रिपेअर केल्या नंतर ग्राहकांना परत देणे हा आमच्या सर्व्हिस चा भाग आहे यामध्ये आमच्या कडून कॉपिराईट कायद्याचा भंग होत नाही.) तरीही त्यांनी हे आम्हाला माहीत नाही आम्ही गुन्हा दाखल करणार असे सांगितले. तेंव्हा त्यांना मी सांगितले कि हि केस कोर्टात माझ्या बाजूने कंपनीचे वकिल लढतीत जेवढे जास्त दिवस चालेल तेवढा कोर्टात हजर रहाण्यासाठी मला व कंपनीच्या वकिलांना जास्त भत्ता मीळेल. तेंव्हा तुम्ही गुन्हा दाखल करा.
या ठिकाणी सुध्दा मला अडकवण्याचा प्रयत्न फसतोय आणि भिती घालून माझ्याकडून काही उकळता येत नाही हे पाहून त्यांनी माझ्या भावाला भिती घालायला सुरुवात केली. तो मला अटक (बेकायदेशीर) केलेल्या तिसऱ्या दिवसांपासून रोज भेटायला येत होता ते आम्हा दोघांना काहीच बोलू देत न्हवते बाहेर जाऊन त्यालाही मदत करायचे नाटक करत तुझा भाऊ खुप चुकला आहे, त्याने सगळ्या गोष्टी साहेबांसमोर कबूल केल्या आहेत सगळे पुरावे त्याच्या विरोधात आहेत. तो कमीत कमी सात वर्षे जेल मध्ये जाईल असे सांगत केस मिटवून टाकली पाहिजे नाही तर तुझा भाऊ आयुष्यातून उठेल अशी भिती घालत होते. आतमध्ये माझ्या चौकशी मधून काहीही हाती लागत न्हवते परंतु बाहेर जाऊन भावाला भिती घालत होते.
असा खेळ सहा दिवस चालला होता.
शेवटी भाऊ चाळीस हजार रुपये द्यायला तयार झाला. सहाव्या दिवशी मला रात्री नऊ साडेनऊ वाजता सोडले.
बाहेर जे काही चालले होते त्याची कल्पना मला जवळपास एक आठवड्यानंतर आली.
त्यांनी त्यांचा खेळ खेळला होता नंतर मी माझी चाल चालली.
यासाठी फार काही करावे लागले नाही ते नेहमीच्या सवयीप्रमाणे सेटलमेंट चा धंदा करत बसले मी लाच लुचपत ला कडून त्यांना पकडून देत गेलो दोन वर्षांत तिघेजण जाळ्यात सापडले.
परंतु तिसरा जो सापडला त्याची रिटायरमेंट काही महिन्यांवर आली होती. ज्या दिवशी त्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले त्याच दिवशी त्याचा हृदय विकाराच्या तिव्र धक्क्याने मृत्यू झाला.
तेथून मात्र मी संबंधित पोलीसांना पकडून देणे बंद केले.
ज्या व्यक्तिने मला अडकवण्यासाठी पैसे दिले होते त्यालाही काहीच शिक्षा करायची नाही असे ठरवून टाकले.
परंतु त्याला शिक्षा होणार हे नियतीनेच ठरवले होते. यानंतर तिन चार वर्षांनी मला शोधत दोन शेतकरी आले त्यांनी तुम्ही त्या व्यक्तीला ओळखता काय असेल तर आमचे एवढे काम करा. त्यांनी आमचे काम करण्यासाठी खुपच पैसे मागितले आहेत. तुमच्याने काही कमी होतात का बघा अशी विनंती केली. तेंव्हा मी त्यांना थोडे दिवस काम पेंडींग ठेवा तो लवकरच तुमच्या गावातून बदली होऊन जाणार आहे तेंव्हा नवीन माणूस तेथे आला कि पाहू असे सांगितले. परंतु ति व्यक्ती पैसे कमी करायला तयार न्हवती. शेवटी वैतागून त्याच्या विरोधात लाचलूचपत कडे त्या दोन शेतकऱ्यांनी तक्रार केली. लाचलुचपत चा माणूस सापळा रचण्या पुर्वी दोन दिवस अगोदर त्याला भेटून सगळा परीसर नजरेखाली घालून गेला (हा त्यांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे जेंव्हा सापळा रचला जाईल तेंव्हा तो कोणासाठी रचला आहे म्हणजेच सावज कोण आहे हे पटकन ओळखता येते) हे मला थोडेसे उशिरा कळले जेंव्हा कळले तेंव्हा मी त्याच्या मित्राकडून त्याला निरोप पाठवला कि त्या दोघांकडून पैसे घेऊ नका तुम्ही अडचणीत याल. परंतु त्याने काहीही ऐकून घेतले नाही. आणि तो स्वताहुन सापडला व निलंबित झाला.

Comments
Post a Comment