एखाद्यास जामीन म्हणून राहणे याचा अर्थ काय? त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आणि का मागितली जातात? एखाद्यास जमीन राहील्याने त्याच्या कोणत्या कृतीने आपले नुकसान होऊ शकते?

आपल्या मित्राने किंवा कुटूंबाच्या सदस्याने घेतलेल्या वैयक्तिक कर्जाची हमी देणारी व्यक्ती म्हणजे जामीनदार. प्राथमिक कर्जदाराने कर्जाची परतफेड न केल्यास ते फेडण्याची जबाबदारी घेणे म्हणजे जामीन राहणे. कर्जाची हमी देणारी व्यक्ती बनणे म्हणजे साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करण्यापेक्षा वेगळे आहे. त्याच्यावर कर्जाची परतफेड करण्याची मोठी जबाबदारी आहे.

बर्‍याच वेळा, सौजन्य किंवा मैत्रीच्या व्यतिरिक्त, काही व्यक्ती कर्जाची हमी देतात. तथापि, कर्ज घेतलेल्या व्यक्तीने दिवाळखोरी जाहीर केल्यास असे जामीनदार कायद्याच्या कचाट्यात अडकतात.

कर्ज घेणारा जी कागदपत्रे सादर करतो ती सर्व कागदपत्रे जामीनदारालाही सादर करावी लागतात.

नमोस्तुते !

एखाद्यास कर्जासाठी जामीन राहिल्यास व त्या कर्जदाराने कर्ज न फेडल्यास ते तुमच्याकडून वसुल केले जाईल.

एखाद्या गुन्हयातील आरोपीला जामीन राहिल्यास व ती व्यक्ती कोर्टाने समन्स काढल्यानंतर उपस्थित न राहिल्यास जितक्या रकमेचा जामीन असेल तेवढी रक्कम कोर्ट तुमच्याकडून वसुल करू शकते.

जामीन राहण्यासाठी जमीनदाराने स्वतः चे नावाचे स्थावर जंगम मालमत्तेची कागदपत्रे, पगाराची पावती, आयकर परतावा प्रमाणपत्र, आधार कार्ड, मतदानाचे ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे जोडावी लागतात.

☺️जामीन राहण्याचे दोन प्रकार आहेत एक कोर्टात किंवा पोलिस ठाण्यात जामीन राहतात आणि दुसरे बँकेत कर्ज काढताना जामीन राहतात .कोर्टात किंवा पोलीस ठाण्यात जामीन राहिल्यास जर जाच्या साठी जामीन राहिला तो माणूस फरारी झाल्यास जामीनदाराला चौकशी साठी बोलावतात. बँकेत जामीन राहिल्यास तो ज्याच्यासाठी जामीन राहिल्यास त्या माणसाने कर्ज वेळेत नाही फेडल्यास ते कर्ज आपल्याला फेडावे लागू शकते.

न्यायालयात जामीन राहणे म्हणजे जेवहा न्यायालयाला आरोपीला हजर असणे आवश्यक वाटते तेवहा त्याला हजर करण्याची जबाबदारी जामीनदारावर असते। जामीन देताना जामीनदाराच्या नावाने संपत्ती असणे आवश्यक आहे जेणेकरून जर आरोपी हजर झाला नाही तर तुम्हाला जितक्या रुपयाला जामीन असाल तेवढे भरून द्यायची जबाबदारी असते।

जामीन राहातांना राशन कार्ड, फोटो, आधार कार्ड, तुमच्या नावावर असलेल्या संपत्तीचे निर्णयक पुरावा द्यावा लागतो।

Comments

Popular posts from this blog

मारपीट करने पर कानून - IPC Section - 323 324 325 326 & 307 308 in Hindi Explanation